Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज जास्त नफा कमविण्याच्या नादात तरुणाने गमावले ८ लाख, धनकवडी परिसरातील घटना

जास्त नफा कमविण्याच्या नादात तरुणाने गमावले ८ लाख, धनकवडी परिसरातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून महाविद्यालयीन तरुणाला गंडा घातल्याचा प्रकार धनकवडी परिसरात घडला आहे. हा प्रकार ४ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२३ यादरम्यान घडला. याबाबत (दि.२४) पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीला अज्ञात मोबाइल क्रमांकावरून मेसेज आला. नेहा नामक महिलेने तुम्ही घरबसल्या टास्क पूर्ण करून भरपूर पैसे कमावू शकता, असे सांगितले. त्यानंतर वेगवेयळ्या प्रकारे टास्कची माहिती दिली. एका टेलिग्राम ग्रुपमध्ये अॅड करून टास्क देण्यात आले. सुरुवातीला १०० रुपये मोबदला देऊन तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार तरुणाला ८ लाख ३ हजार रुपये गुंतविण्यास भाग पाडले.

एका वेबसाईटवर मिळालेला नफा दिसत होता. मात्र, प्रत्यक्षात पैसे काढण्यास गेले असता पैसे निघत नसल्याने तक्रारदार यांनी विचारणा केली. त्यावेळी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांना ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्राद्र यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक माळाळे हे करत आहेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments