Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजजबरदस्तीने जागेचा ताबा घेऊन जागा मालकाला मारहाण; 8 जणांवर गुन्हा, कोरेगाव पार्क...

जबरदस्तीने जागेचा ताबा घेऊन जागा मालकाला मारहाण; 8 जणांवर गुन्हा, कोरेगाव पार्क येथील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : कोरेगाव पार्क येथील जागेचा जबरदस्तीने बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न करुन जागा मालकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 3 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क येथील लेन नं. 7 मधील प्लॉट नंबर 405 याठिकाणी घडला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दोन महिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नंदू अंतराम रजपूत (वय-59, रा. वारजे जकात नाका, वारजे) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अजय शिंदे, गौरव कवडे, राधाबाई कवडे, उदय कोटणीस, हेमा कोटणीस, पिंटू बापजी यांच्यासह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजपुत हे जावई निलेश बिरे, चालक तामशेटे यांच्यासह कोरेगाव पार्क येथील लेन नं. 7 मधील फायनल प्लॉट नंबर 405, सिटीएस 192 येथे गेले होते. त्यावेळी आरोपींनी मोकळ्या जागेत तंबू उभारलेला दिसला. त्याठिकाणी आरोपी सिगारेट ओढत बसले होते. फिर्यादी यांनी ही जागा माझी असून या ठिकाणी बसू नका असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपी अजय शिंदे याने तुझा काय संबंध, ही जागा आमची आहे, असे म्हणत शिवीगाळ करुन कानशिलात लगावली. तसेच फिर्यादी यांचे जावई निलेश बिरे यांना धक्काबुक्की केली.

तसेच इतर आरोपींनी हातात लाकडी बांबू व लोखंडी रॉड घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर धाऊन आले. या जागेचा आणि तुमचा काहीही संबंध नाही असं म्हणत शिवीगाळ करुन तिथून हकलून दिले. यावेळी त्याठिकाणी जमलेल्या नागरिकांना देखील आरोपींनी धमकावून दहशत पसरवली. फिर्यादी तिथून जात असताना आरोपी अजय शिंदे याने दगड कारच्या पुढील काचेवर मारुन काच फोडून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे चेतन मोरे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments