Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज जप्तीची वाहने परस्पर विक्री केल्याने 4 पोलिसांचे निलंबनः काळभोर पोलिस ठाण्यातील...

जप्तीची वाहने परस्पर विक्री केल्याने 4 पोलिसांचे निलंबनः काळभोर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा प्रकार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वेगवेगळ्या कारवाईतील पोलिसांनी जप्त केलेल्या चारचाकी व दुचाकी अाणि बेवारस वाहने पोलिस कर्मचाऱ्यांनीच परस्पर विक्री केल्याचा प्रकार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात उघडकीस अाला. त्यानंतर परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त अार. राजा यांनी ४ पोलिस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले. नुकतेच उरळीकांचन पोलिस ठाण्याचे उद्घाटन करण्यात अाले ते पुणे ग्रामीण पोलिस अंतर्गत येते. लोणी काळभोर व उरळीकांचन पोलिस ठाण्यातील मालमत्तेचे विभाजन करताना वाहन चोरीचा प्रकार लक्ष्यात आला.

पोलिस हवालदार दयानंद दशरथ गायकवाड, पोलिस नाईक संतोष शंकर अांदुरे, पोलिस शिपाई राजेश मनोज दराडे व पोलिस शिपाई तुकाराम सदाशिव पांढरे अशी निलंबित करण्यात अालेल्यांची नावे अाहेत. त्यांनी स्वतःच्या अार्थिक फायद्यासाठी ठाण्यात जमा केलेल्या गाड्या ९ दुचाकी आणि ९ कार अशी १८ वाहने विक्री करून ४ लाख ६० हजार रुपये प्राप्त केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे सदर पोलिस कर्मचारी हे विना परवानगी कर्तव्यावर गैरहजर असल्याचे दिसून अाले. त्यामुळे त्याचे वर्तन हे पोलिस खात्याच्या शिस्तीस धरुन नसून अत्यंत गंभीर, बेजबाबदार व गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य त्यांनी केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे निलंबन केल्याचे आदेशात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments