Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजजखमी चित्रबलाक पक्षाला जीवदान; युवकांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण

जखमी चित्रबलाक पक्षाला जीवदान; युवकांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

इंदापूर : इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या मागील बाजुस असलेल्या झाडीत जखमी अवस्थेत अडकलेल्या चित्रबलाक पक्षाला युवकांनी जीवदान दिले आहे.

सोमवारी (दि.17) शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या मागील बाजुला झाडीमध्ये एक चित्रबलाक नावाचा पक्षी जखमी अवस्थेत अडकला होता. त्या जखमी पक्षाला पाहून पर्यावरण प्रेमी ऍड. आशुतोष भोसले, सद्दाम सय्यद, सोहेल सय्यद, वेदांत घोरपडे या युवकांनी चित्रबलाक पक्षाला शिफाईतिने सोडवले.

तसेच त्याला प्रथमोचार करुन इंदापूर परिक्षेत्र वन अधिकारी अजित सूर्यवंशी यांच्याशी संपर्क करून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. जखमी पक्षाला पुढील उपचारासाठी बारामती इथे पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, युवकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमी चित्रबलाक पक्षाला उपचार मिळल्याने त्याचा जीव वाचण्यास मदत झाली. त्यामुळे युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा प्रकारे कुठेही वन्य पशु, पक्षी हे जखमी अस्वस्थेत आढळून आल्यास वनविभागास संपर्क करण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments