Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील वाहतुकीत बदल..!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील वाहतुकीत बदल..!

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहराच्या विविध भागात बदल करण्यात येणार आहेत. मध्य भागातून काढण्यात येणारी मिरवणूक, व ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेनिमित्त मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बुधवारी (19 फेब्रुवारी) बदल करण्यात येणार आहेत. पदयात्रेनिमित्त सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन रोड वरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. शहराच्या मध्य भागातील लक्ष्मी रोड, छत्रपती शिवाजी रोड, बाजीराव रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. संपूर्ण दिवसासाठी हा बदल असेल.

जंगली महाराज रोड, संचेती चौक, खंडोजीबाबा चौकादरम्यान वाहतूक व्यवस्थेत बदल

हा बदल मिरवणुकीचा शेवट होईपर्यंत मध्य भागातील वाहतूकीत बदल राहणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. केंद्रीय युवा कार्यक्रम, क्रीडा मंत्रालयाकडून ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेचा प्रारंभ शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी नऊच्या सुमारास होणार आहे. त्यामुळे जंगली महाराज रस्ता, संचेती चौक, खंडोजीबाबा चौकदरम्यान वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी चौकातून येणारी वाहतूक मंगळवार पेठेतील कामगार पुतळ्याकडे वळविण्यात येणार आहे.

दुसरीकडे केळकर रस्ता मार्गे काकासाहेब गाडगीळ पूल, भिडे पूलावरून जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेचडेक्कन जिमाखाना भागातील खंडोजीबाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत (नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथ) वाहतूक टप्याटप्याने बंद करण्यात येईल. कोथरुड, कर्वे रस्त्याने डेक्कनकडे येणारी वाहतूक एसएनडीटी महाविद्यालयमार्गे विधी महाविद्यालय, तसेच नळस्टॉपकडे वळविण्यात येणार आहे. टिळक रस्त्याने खंडोजीबाबा चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकता भासल्यास पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments