इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बीकेसीतील जियो कन्व्हेशन सेंटरमध्ये रेल्वेच्या विकासाबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पाची माहिती देताना ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या दहा दिवसाच्या आयकॉनिक रेल्वे टुरची घोषणा केली. जी गड किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांना जोडणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ही रेल्वे टूर शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याबरोबरच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना देखील जोडणार आहे. दहा दिवसाच्या या प्रवासात पर्यटकांना महाराष्ट्राचा समृद्ध वारसा अनुभवता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याचबरोबर ही टूर केंद्र सरकारच्या पाठबळाने लवकरच सुरू होणार असल्याचही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात रेल्वे विकासासाठी विक्रमी निधी देण्यात आला असून, याद्वारे 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही समावेश आहे. यावर्षी रेल्वे अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला 23 हजार 700 कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.