इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बारामती : भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्यानिवडणुकीमध्ये कारखान्याच्या आणि शेतकऱ्याच्या हितासाठी आम्ही पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा दिला होता. परंतु, त्यांनी जाहीर केलेल्या पॅनलमध्ये आमच्या पक्षातील कोणत्याही उमेदवाराला संधी देण्यात आली नाही, किंवा सदर यादी तयार करताना आम्हाला विश्वासात घेतले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर या निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाने तटस्थ भूमिका घेऊन छत्रपती कारखान्याच्या निवडणूक प्रचारामध्ये कोणाच्याही बाजूने अथवा विरोधात भूमिका घेणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष अॅड तेजसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय श्री जय भवानीमाता पॅनेलच्या उमेदवारांची यादी आज शुक्रवारी (दि २) जाहीर केली. यानंतर अॅड. तेजसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती शहर कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करून पक्षाची भूमिका स्पष्ट केली.