इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिवेणीनगर चौकात चौघांच्या टोळक्याने तिघांना डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (ता. ४) सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान घडली. बाळासाहेब बाबासाहेब खामकर (वय ३२, रा. तळवडे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कपिल जाधव, सुनील मेंगडे, ऋषिकेश आणि अशोक मेंगडे (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी पोलसांनी मेंगडे आणि ऋषिकेश यांना अटक केली आहे. गुरुवारी (दि.५) रोजी बाळासाहेब खामकर यांनी चिखली पोलिसात तक्रार दिली आहे.
याबाबतपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जून २०२५ रोजी संध्याकाळी ७ ते ८ वाजन्याच्या दरम्यान फिर्यादी बाळासाहेब व त्यांच्या मित्रांना त्रिवेणीनगर चौकात बोलावून आरोपींनी शिवीगाळ करून त्यानंतर दगड व लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी आणि त्यांच्या २ मित्रांना गंभीर दुखापत झाली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.