इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई, 31 ऑक्टोबर : कुत्रे हे इमानदार असतात असं मानलं जातं. ते आपल्या मालकासाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. याबद्दल आपण ऐकलं ही आहे आणि त्यासंबंधीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुमचा कुत्र्याच्या इमानदारीचं आणखी एक उदाहरण मिळेल. लोकांची मने जिंकणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या कुत्र्यासोबत फिरायला बाहेर पडल्याचे दिसत आहे.
अंधार आहे आणि रस्ता सुनसान आहे. यादरम्यान एक दुचाकी त्याच्या समोरून जाते आणि अचानक यू-टर्न घेते आणि त्या व्यक्तीकडे परत येते. जाहिरातमागे बसलेली व्यक्ती खाली उतरते आणि त्या माणसावर झडप मारते. परंतू तो या व्यक्तीला स्पर्श करण्याआधी कुत्रा त्याच्या अंगावर झडप घेतो आणि ज्यामुळे अखेर घाबरुन या चोरांना हार मानावी लागते आणि ते त्याच्या साथीदारासह पळून जातात. ज्यामुळे या व्यक्तीचे प्राण वाचतात शिवाय त्याची कोणतीही वस्तू देखील चोरीला जात नाही. That’s why dogs are our best friends! pic.twitter.com/QThqPxcVXW- Figen (@TheFigen_) October 27, 2023 व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘यामुळे कुत्रे आमचे चांगले मित्र आहेत.
व्हिडीओ X वर @Figen नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हजारो लोकांनी ते शेअर केले आहे आणि 283K वापरकर्त्यांनी ते लाइक केले आहे. हा व्हिडीओ पाहून लोकही भावूक झाले. लोकांनी खूप सुंदर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘ते खरोखर आमचे चांगले मित्र आहेत.’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘संध्याकाळच्या फिरण्यासाठी कुत्रे हे तुमचे सर्वोत्तम साथी आहेत.