Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजचोरांचा सुळसुळाट ! खामगाव येथे 15 दिवसांपूर्वी घरफोडी झालेल्या दोन घरात पुन्हा...

चोरांचा सुळसुळाट ! खामगाव येथे 15 दिवसांपूर्वी घरफोडी झालेल्या दोन घरात पुन्हा चोरी; चोरट्यांना पकडण्याचे यवत पोलिसांसमोर आव्हान

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

यवत : खामगाव येथे 15 दिवसांपुर्वी घरफोडी झालेल्या दोन घरात पुन्हा चोरी झाली आहे. त्यामुळे चोरट्यांनी यवत पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. खामगाव परिसरात गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच (दि.28) मे रोजी एकाच दिवशी पाच ठिकाणी चोरी झाली होती.

यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे, याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करीत पोलिस जनजागृती करीत असताना खामगाव येथे चोरट्यांनी पंधरा दिवसांपूर्वी घरफोडी केलेल्या दोन घरात पुन्हा एकदा चोरीचे धाडस केल्याने यवत पोलिसांसमोर जणू आव्हानच निर्माण केले आहे.

खामगावच्या हद्दीतील गणेश नगर येथील रामचंद्र जयसिंग नलावडे यांचे पंधरा दिवसांपूर्वी चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत जवळपास चार तोळे सोने व 35 हजारांची रोख रक्कम चोरीस गेली होती. तर गुरुवारी (ता. 13) काल रात्री एक ते दोनच्या दरम्यान पुन्हा एकदा घरफोडी करत दोन हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. तसेच शेलारवाडी गाडामोडी रोड जवळ सुदाम जयसिंग नागवडे यांचे 20 हजार रुपये रोख रक्कम चोरांनी पळून नेली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पंधरा दिवसापूर्वी घरफोडी झालेल्या घरातच पुन्हा एकदा चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

नागरिकांनीच सतर्क राहण्याची गरज

नागरिकांनी मौल्यवान वस्तू आणि रक्कम सुरक्षित स्थळी ठेवून रात्री दरवाजा, खिडक्या बंद केल्या आहेत का? याची खातरजमा करून सावध राहण्याची गरज आहे तरच चोऱ्यांवर आळा बसू शकेल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments