इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : घराजवळ असलेल्या बेकरीतून साहित्य खरेदीसाठी बाहेर जाणे, ज्येष्ठ महिलेला महागात पडले आहे. चोरट्यांनी उघड्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करीत ३५ हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख ७४ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २७ मार्चला सकाळी साडेआठच्या सुमारास कसबा पेठेतील मेट्रोस्टेशनजवळ ढोलेवाड्यात घडली. याप्रकरणी ६२ वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कसबा पेठेतील ढोले वाड्यात राहायला आहेत. २७ मार्चला सकाळी साडेआठच्या सुमारास बेकरीतून साहित्य खरेदी करण्यासाठी जेष्ठ महिला बाहेर पडल्या होत्या. त्यावेळी त्यांनी दरवाजा बंद न करता ओढून घेतला होता. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांनी महिलेच्या घरात प्रवेश केला. कपाटातील ३५ हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख ७४ हजारांचा ऐवज चोरून नेला. बेकरीतून आल्यानंतर महिलेला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी तपास करीत आहेत