Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज चेअरमन होण्यावरुन दोघा ज्येष्ठांमध्ये जुंपली; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

चेअरमन होण्यावरुन दोघा ज्येष्ठांमध्ये जुंपली; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे: दोघेही ज्येष्ठ नागरिक, एकाच सोसायटीत राहणारे, एक चेअरमन तर दुसर्याला चेअरमन होण्याची इच्छा त्यातून या दोघा ज्येष्ठांमध्ये चांगलीच जुंपली. एकमेकांना चप्पलने मारहाण करुन खुर्ची फेकून जखमी केले गेले. हे प्रकरण पोलिसांकडे गेल. पोलिसांनी दोघांवरही गुन्हे दाखल करुन टाकले. हा प्रकार वडगाव येथील नवले पुलाजवळील डि व्हिस्टेरिया पार्क या सोसायटीत रविवारी सायंकाळी सव्वासात वाजता घडला.

याबाबत एका ६७ वर्षाच्या ज्येष्ठाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ६० वर्षाच्या नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच सोसायटीत रहायला आहे. फिर्यादी हे सोसायटीचे चेअरमन आहेत. तर आरोपींना चेअरमन व्हायचे आहे. आरोपीने रागामध्ये तू चेअरमन पदाचा राजीनामा दे मला चेअरमन व्हायचे आहे. तू मला कोणतेही काम सांगायचे नाही, असे म्हणत शिवीगाळ करुन प्लास्टिकची खुर्ची फिर्यादींना फेकून मारुन जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

याविरोधात ६० वर्षाच्या ज्येष्ठाने फिर्याद दिली असून पोलिसांनी चेअरमन यांच्यावर गुन्हा दखल केला आहे. फिर्यादी हे चेअरमन यांना तुम्ही मला चेअरमन नको आहे, असे म्हणाले असताना चेअरमन यांना त्याचा राग येऊन त्यांनी शिवीगाळ करुन पायातील चप्पल काढून देशपांडे यांना मारली. शेजारील प्लास्टिक खुर्चीने मारहाण करुन जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस हवालदार कुंभार तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments