Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज चालू वर्षात पुणे जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक पीक कर्जवाटप: जिल्हाधिकारी डॉ. ...

चालू वर्षात पुणे जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक पीक कर्जवाटप: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती; 5,763 कोटी पीक कर्जाचे वाटप

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे जिल्हा किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पीक कर्ज वाटपामध्ये सलग तिसऱ्या वर्षी उच्चांक गाठत दरवर्षी नवनवे विक्रम स्थापित करत आहे. सन २०२३-२४ मध्ये गतवर्षी ३१ डिसेंबर पर्यंतच एकूण ५ हजार ७६३ कोटी रुपये इतके पीक कर्ज वाटप जिल्ह्यात झालेले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.

देशमुख म्हणाले, गत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण 5 हजार 20 कोटी रुपये आणि त्यापूर्वी 2021-22 मध्ये 3 हजार 893 कोटी इतके पीक कर्ज वाटप जिल्ह्यात झाले होते. तत्पूर्वी 2015-16 साली 3 हजार 506 कोटी 31 लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले होते. त्यानंतर हा विक्रम थेट 2021-22 मध्ये मोडण्यात आला आणि त्यानंतर सलग तीन वर्षे नवीन विक्रम होत आहेत. यावर्षीच्या 5 हजार 500 कोटी रुपये एवढ्या उद्दिष्टापेक्षा २६३ कोटी रुपये अधिक कर्ज वाटप करून उद्दिष्टाच्या १०५ टक्के कामगिरी केली आहे.

यामध्ये मत्स्यव्यवसायासाठी २ कोटी २ लाख रुपये तसेच पशुपालनासाठी १७ कोटी ७६ लाख रुपये कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. फेब्रुवारी आणि मार्चची आकडेवारी समोर आल्यावर यात आणखी मोठी भर पडण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटपाबाबत वेळोवेळी बँकाची जिल्हा पातळीवर बैठक घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँका, खासगी क्षेत्रातील बँका तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जास्तीत जास्त पीक कर्जवाटपासाठी प्रोत्साहित केले. या सर्व प्रक्रियेत जिल्हा अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनीदेखील मोलाची भूमिका बजावली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र पुणे शहर परिमंडळाचे तत्कालीन महाव्यवस्थापक राजेश सिंग व सध्याच्या महाव्यवस्थापक अपर्णा जोगळेकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

 

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments