इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे: आपल्यापैकी अनेकांकडे मोबाईल फोन असेलच. हा फोन वापरताना काही काळजी देखील घ्यावी लागते. त्यात चार्जिंग पोर्ट हा फोनच्या सर्वात संवेदनशील भागांपैकी एक आहे. काही कालावधीनंतर फोनच्या चार्जिंग पोर्टमध्ये धूळ साचते, ज्यामुळे फोन चार्ज करण्यात अडचण येऊ शकते. अनेक वेळा लोक फोनचे चार्जिंग पोर्ट साफ करताना काही चुका करतात, ज्यामुळे पोर्ट तुटतो आणि फोन खराब होऊ शकतो. त्यामुळे चार्जिंग पोर्ट साफ करताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
तुम्ही साफ करण्यास सुरू करण्यापूर्वी तुमचा फोन बंद करा. चार्जिंग पोर्ट स्वच्छ करण्यासाठी नेहमी ड्राय आणि सॉफ्ट साहित्य वापरा. तुम्ही सॉफ्ट ब्रश, कापूस किंवा मायक्रोफायबर कापड वापरू शकता. चार्जिंग पोर्टमध्ये साचलेली धूळ आणि घाण हलक्या हातांनी स्वच्छ करा. जास्त दाब लागू केल्यास पोर्ट तुटू शकतो. जर चार्जिंग पोर्टमध्ये खूप घाण जमा झाली असेल तर तुम्ही टूथपिक वापरू शकता. परंतु, ते अतिशय काळजीपूर्वक वापरावे आणि जास्त दबाव लागू देऊ नका.
टूथपिकसोबत तुम्ही कॉम्प्रेस्ड एअरचीही मदत घेऊ शकता. कॉम्प्रेस्ड एअर कॅन वापरून तुम्ही पोर्टमध्ये अडकलेली धूळ काढू शकता. असे जरी असले तरी स्मार्टफोनचे चार्जिंग पोर्ट साफ करण्यासाठी कधीही धातूच्या वस्तू वापरू नका. यामुळे पोर्ट स्क्रॅच होऊ शकते आणि त्याचे नुकसान होऊ शकते. चार्जिंग पोर्ट साफ करताना कधीही जास्त दाब लावू नका. यामुळे पोर्ट तुटू शकते.
कधीही वापरू नका पाणी
तसेच, पोर्ट स्वच्छ करण्यासाठी कधीही पाणी वापरू नका. यामुळे पोर्टचे नुकसान होऊ शकते. याशिवाय चार्जिंग पोर्ट नियमितपणे साफ करत राहा. यामुळे घाण साचण्यास प्रतिबंध होईल आणि पोर्ट दीर्घकाळ सुरळीत राहील.