इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) चाकण परिसरातील वाहतूक कोंडीवर (Pune Traffic) तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील वाहतुकीची वाढती समस्या लक्षात घेता विशेषतः चाकण आणि एमआयडीसी भागातील अरुंद रस्ते आणि पर्यायी मार्गांच्या अभावामुळे लोकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून पीएमआरडीएने ‘मिसिंग लिंक’ हा प्रकल्प हाती घेतला आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मेदनकरवाडी, कडाचीवाडी, खराबवाडी आणि नाणेकरवाडी या चार गावांमध्ये रस्त्यांसाठी जमीन भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. या संदर्भात ४ ऑगस्ट रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. या गावांमध्ये जमीन मिळाल्यानंतर अपूर्ण रस्त्यांना जोडून नवीन रिंगरोड तयार केला जाईल, ज्यामुळे चाकण परिसरातील वाहतूक सुरळीत होईल. असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी या भागाची पाहणी केली असून, त्यांच्या मार्गदर्शनानुसार पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी रस्त्यांच्या सद्यस्थितीचा अभ्यास करून हा उपाय सुचवला. ‘मिसिंग लिंक’ जोडल्यामुळे वाहतूक दोन मार्गांवर विभागली जाईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.