Tuesday, July 15, 2025
Homeक्राईम न्यूजचांगावटेश्वर महाराज पालखीचे बोरी भडक गावात जंगी स्वागत

चांगावटेश्वर महाराज पालखीचे बोरी भडक गावात जंगी स्वागत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

यवत (पुणे): संत योगीराज चांगावटेश्वर महाराज यांच्या पालखीचे बोरी भडक गावात गणराज ग्रुप व ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात व भक्तिभावाने जंगी स्वागत करण्यात आले.

पालखी सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास बोरी भडक हद्दीत दाखल झाली. यावेळी बोरी-ऐंदी कॅनॉल पुलाजवळ ग्रामस्थांनी फुलांची उधळण करत, बँड पथक व भगवे झेंडे फडकावत आनंदोत्सवात स्वागत केले. संभाजी गव्हाणे यांच्या स्मरणार्थ गणराज ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांसाठी नाश्ता व फराळाचे वाटप करण्यात आले.

या स्वागत समारंभास दौंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गणराज ग्रुपचे संस्थापक व ग्रामपंचायत सदस्य आकाश दादा गव्हाणे, उद्योजक बाबाराजे गव्हाणे, उद्योजक संदीप गव्हाणे, बाजीराव कोळपे, सदस्य अमोल म्हेत्रे, पोलीस पाटील विजय गव्हाणे, बाळासाहेब ढवळे, शिवाजी येळकर, काळूराम ढवळे, भाऊसाहेब कोपनर, खंडू कोळपे, संभाजी कांचन, ऐश्वर्या गव्हाणे, संगीता गव्हाणे, संगीता दुधाळ, दत्तात्रय खेडेकर, नामदेव ससाने यांच्यासह असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान, या पालखी स्वागतामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला. गावात हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद आणि वारकऱ्यांचा उत्साह यावेळी अनुभवायला मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments