इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर एका चहावाल्याने लाखो रुपयांचा घोटाळा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चहावाल्याने कन्फर्म तिकीट घोटाळ्यातून महिन्याला तब्बल दीड ते दोन लाख रुपयांची कमाई केली असल्याचे उघड झाल आहे. दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी या चहावाल्याचा कारनामा उघड केला असून त्याला ताब्यात घेतलं आहे.
रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी नागरिकांना खूप वाट पाहावी लागते किंवा कोणत्यातरी एजंटकडून कन्फर्म तिकीट घ्यावे लागते त्यासाठी त्यांना अधिक पैसे देखील मोजावे लागतात. असाच कन्फर्म तिकिटाचा घोटाळा उघडकीस आला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर असणाऱ्या चहावाल्यांन हा घोटाळा केला असल्याच समोर आला आहे. या ठिकाणी त्याच चहाच दुकान आहे. हा चहावाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना चहा पुरवायचा आणि त्यांच्याशी ओळख वाढवायचा. त्यानंतर त्याच अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांचा वापर करून व्हीआयपी कोट्यातून तिकीट कन्फर्म करून द्यायचा. या घोटाळ्यातून त्याला महिन्याला तब्बल दीड ते दोन लाख रुपये मिळायचे. या तिकीट विक्रीतून इतकी कमाई केल्याचे पाहून अधिकारीही आश्चर्यचक झाले. आता या प्रकरणी दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी चहा विक्रेत्याला ताब्यात घेतल आहे.
रवींद्र कुमार साहू असं या चहा विक्रेत्याचे नाव आहे. साहू हा सीएसएमटी रेल्वे कॅन्टीनमध्ये कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन त्याने रेल्वे तिकीट कन्फर्मचा घोटाळा केला. त्याच्या विरोधात पोलिसांना गुन्हा दाखल केला असून रेल्वेची फसवणूक केल्याचा आरोप ही त्याच्यावर करण्यात आला आहे.