Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजचहाच्या कपात माशी दिसली अन्...' : पुण्याच्या पर्यटकाला हातपाय बांधून हॉटेल मालकासह...

चहाच्या कपात माशी दिसली अन्…’ : पुण्याच्या पर्यटकाला हातपाय बांधून हॉटेल मालकासह 6 जणांकडून मारहाण..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पर्यटनास गेलेल्या पुण्याच्या पर्यटकाला दोरीने बांधून कपडे फाटेपर्यंत हॉटेल मालकासह 6 जणांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिंधुदुर्ग जिल्यातील कुडाळ तालुक्यात गुरुवारी (दि.६) ही घटना घडली आहे. रुपेश बबन सकपाळ (वय ३३, रा. कात्रज, पुणे) असे पर्यटकाचे नाव आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती कुडाळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 6.30 च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर झारप झिरो पॉईंटवर प्रकार घडला आहे. याप्रकरणी, तनवीर करामत शेख, शराफत अब्बास शेख (वय ५७), अब्बास ऊर्फ साहिल शराफत शेख (१८), परवीन शराफत शेख (४२), साजमीन शराफत शेख (१९) आणि तलाह करामत शेख (२६, सर्व रा. झाराप खान मोहल्ला, ता. कुडाळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

रुपेश बबन सकपाळ हे मित्रांसह गोव्याला जात होते. हे सर्व चहा पिण्यासाठी झाराप झिरो पॉईंट येथे थांबले. त्यावेळी एका चहाच्या कपात माशी पडलेली सपकाळ यांना दिसून आली. ही बाब हॉटेल मालक तनवीर करामत शेख यांच्या निदर्शनास आणुन दिली आणि चहा बदलून देण्यास सांगितलं. पण चहा बदलून देण्यास हॉटेल मालकाकडून नकार देण्यात आला. त्यावेळी चहाचे पैसे देणार नाही, असे सकपाळ यांच्याकडून सांगण्यात आले. त्यावरून हॉटेल मालक आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी हॉटेल मालकासह सहा जणांनी या सकपाळ यांचे हातपाय बांधून त्यांना रस्त्यावर झोपविले आणि मारहाण करण्यात आली.

इतकेच नाही तर सपकाळ यांच्यासोबत असलेल्या संजय सुदाम चव्हाण (पुणे) याला देखील मारहाण करण्यात आली. या दरम्यान सपकाळ यांचे कपडे फाडून हातपाय दोरीने बांधून ठेवण्यात आले. या प्रकरणाचा पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments