इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात बनावटकागदपत्रांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पाच मिनिटांत शंभर रुपये पासून ते पाचशे रुपये पर्यंत उत्पन्नाचे आणि जातीचे प्रमाणपत्र तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा, शहादा आणि तळोदा तालुक्यांमध्ये समोर आला आहे.
धडगाव शहराताल आधकृत सायबर सटर चालक मंगेश पावरा यांच्या नावाचा गैरवापर करून काही सायबर भामटे बनावट जातीचे दाखले आणि उत्पन्नाचे दाखले तयार करत असल्याची बाब उघड झाली आहे. धडगाव पोलिस ठाण्यात या संदर्भात मंगेश पावरा यांनी तक्रार दाखल केली असून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बनावट कागदपत्रांच्या संदर्भात शहादा-तळोदा मतदार संघाचे भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माहिती दिली आहे. तसेच सायबर चालक आदिवासी बांधवांची फसवणूक करत बनावट जातीचे दाखले आणि उत्पन्नाचे दाखले तयार करत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा आमदार राजेश पाडवी यांनी दिला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात सायबर भामट्यांचा सुळसुळाट झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बनावट दाखल्यांचा प्रकार समोर आला होता. मात्र, प्रशासनाच्या वतीने त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रमाणात वाढ झाली असून या बनावट दाखल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होत आहे. पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.