इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली | 21 ऑक्टोबर 2023 : चंद्रयान आणि आदित्य एल 1 मोहिमेने भारताच्या आशा बळकट झाल्या आहेत. अंतराळातील घडामोड भारताला खुणावत आहे. मानवासहित अंतराळात सफर करण्याचे भारतीयांचे स्वप्न गगनयान मोहिमेतून पूर्ण होणार आहे. गगनयान मोहिम ही पहिली मोठी चाचणी आहे. यापूर्वीच्या दोन्ही मोहिमा यशस्वी झाल्यानंतर गगनयानची चाचपणी करण्यात येत आहे. इस्त्रोने त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. अर्थात चंद्रयान आणि सूर्यावरील आदित्य एल 1 मोहिमेपेक्षा गगनयान मोहिमेचा खर्च • अफाट आहे. या मोहिमेसाठी भारताला इतका खर्च आला आहे.
मिशन गगनयान आहे तरी काय?
गगनयान हे भारताचे पहिले Human Space Mission आहे. हे मिशन तीन दिवसांचे असेल. यामध्ये तीन सदस्य असतील त्यांना पृथ्वीच्या कक्षेत 400 किमीवर पाठविण्यात येईल. त्यानंतर या सदस्यांना सुरक्षितपणे समुद्रात उतरविण्यात येईल. यात यश आले तर अमेरिका, चीन आणि रशियानंतर अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा देश असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार गगनयान मोहिमेसाठी जवळपास 90.23 अब्ज रुपये देण्यात आले आहे.
या मोहिमेतून काय साध्य होणार
भारताच्या गगनयान मोहिम यशस्वी झाल्यास भारतीय अंतराळवीरांना अंतराळाचा अभ्यास, संशोधन आणि अंतराळाचे वातावरण समजून घेण्याची संधी मिळेल. या मोहिमेमुळे अंतराळ संशोधनात भारताला मोठी झेप घेता येईल. तसेच इतर मोहिमांना पण त्याचा फायदा होईल. या मोहिमेमुळे जागतिक स्तरावर भारताचा दबदबा तयार होईल. अशी मोहिम राबविणारा भारत चौथा देश ठरेल.
चंद्रयानपेक्षा मोहिम किती महाग?
अंदाजानुसार गगनयान मोहिम, चंद्रयान 3 पेक्षा 14 पट महाग असेल. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, गगनयान मिशन जवळपास 9023 कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. तर चंद्रयान 3 मिशनासाठी 650 कोटी रुपयांचा खर्च आला होता. तर इस्त्रोच्या मिशन आदित्य L1 चे बजेट 400 कोटी रुपये होते.
अंतराळवीरांची वसाहत
2030 पर्यंत चंद्रावर 40 तर पुढील 10 वर्षांत 2040 पर्यंत एक हजारांहून अधिक अंतराळवीर चंद्रावर वस्ती करतील. त्यांची चंद्रावर वसाहत असेल. पृथ्वीवरील दक्षिण ध्रुवात जसे संशोधन सुरु आहे. तसेच संशोधन प्रकल्प तिथे सुरु होतील. मानवी वसाहतीच्या दृष्टीने पाणी गवसल्यास मोठा फायदा होईल.