Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज चंद्रग्रहण पाहताना काय करावे आणि काय करू नये, या गोष्टी ठेवा...

चंद्रग्रहण पाहताना काय करावे आणि काय करू नये, या गोष्टी ठेवा लक्षात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : आज रात्री वर्षातले दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण (Lunar (Eclipse Today) होणार आहे. हे आंशीक चंद्रग्रहण असणार आहे, म्हणजेच चंद्राचा काही भागचं हा पृथ्वीच्या छायेखाली असेल. हे ग्रहण काही कारणांमुळे विशेष ठरतेय. त्यापैकी एक म्हणजे आज शरद पौर्णिमेच्या दिवशी हे ग्रहण होणार आहे आणि दुसरे कारण म्हणजे ते भारतातून पाहाता येणे शक्य आहे. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. खगोलप्रेमींना याचे विशेष आकर्षण असते. हे ग्रहण आपल्याकडे दिसत असल्याने आज अनेकांनी ते पाहाण्याचा बेत • आखला असेल. तुम्हालासुद्धा आजचं ग्रहण पाहायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा चंद्रग्रहण पाहाण्याचा अनुभव हा अविस्मरणीय होऊ शकतो.

चंद्रग्रहण पाहाताना काय करावे आणि काय करू नये

ग्रहण ही खगोलीय घटना आहे ते पाहिल्याने कुठलाही अपाय होत नाही, मात्र ते पाहाताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहू नये. ते पाहाण्यासाठी गॉगलचा वापर करावा.

ग्रहणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी हे आंशीक ग्रहण असणार आहे. हे ग्रहण कसे असते या बद्दल आधीच माहिती करून घ्यावी जेणे करून इतरांना तुम्ही त्याबद्दल सांगू शकाल.

ग्रहण पाहायला जाताना उबदार कपडे घाला, कारण आज शरद पौर्णिमा आहे. अनेक ठिकाणी थंडी पडायला सुरूवात झाली आहे. रात्री थंडीत बाहेर राहिल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

ही दुर्मिळ खगोलीय घटना पाहाण्याचा तुम्ही बेत आखला असेल तर, कदाचीत तुम्हाला ग्रहणाची पुर्ण स्थिती पाहाण्यासाठी थोडी वाट पाहावी लागू शकते. त्यामुळे शक्यतो जेवण करूनच गच्चीवर या. तसेच सोबत पाण्याची सोय ठेवा.

तुम्हाला जर ग्रहणाचे क्षण कॅमेरात टिपायचे असेल तर आधी तुमचा कॅमेरा किंवा स्मार्टफोन पुरेसा चार्ज करा. यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फोटो काढणे शक्य होईल.

फोटो काढण्याआधी तुमच्या कॅमेराची लेंन्स स्वच्छ करा. यामुळे ग्रहणाच्या फोटोची क्लियारिटी चांगली मिळेल. हे फोटो तुम्ही नंतर सोशल मीडीयावर शेअर करू शकता. तुमच्या फोटोचा दर्जा जर उत्तम असेल तर तुम्ही ते वेबसाईटवर विकूही शकता.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments