Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजचंदननगर पोलिस ठाण्यात परित्याग करणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखलः टी-शर्टमध्ये गुंडाळून महिला अर्भक...

चंदननगर पोलिस ठाण्यात परित्याग करणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखलः टी-शर्टमध्ये गुंडाळून महिला अर्भक फेकले सामाजिक संस्थेच्या दारात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

स्त्री जातीचे अर्भक जन्मल्यानंतर त्याला एका सामाजिक संस्थेच्या दारात फेकून परित्याग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात परित्याग करणाऱ्या संबंधीत अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनिषा शिंदे (49, रा. वडगांवशेरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनिषा शिंदे या चिल्ड्रन एचआरए म्हणून वडगांवशेरी येथील प्रेमनगर मधील माहेर संस्थेत काम पाहतात. दि. 24 एप्रिल रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास त्यांना नव्याने जन्माला आलेले दोन दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक टिशर्टमध्ये गुंढाळून संस्थेच्या गेटवर सोडून दिल्याचे आढळून आले. याप्रकरणी त्यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

मोक्काच्या गुन्ह्यात दीड वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

खुनी हल्ला केल्यानंतर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा (मोक्का) अन्वये कारवाई झालेल्या गुन्ह्यात तब्बत एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

अजित उर्फ जोजो जगदीश शेट्टी (23, रा. राजे चौक, रिगल बेकरी जवळ, चव्हाण कॉम्प्लेक्स, मोहननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

शेट्टी याचा मागील एक वर्षापासून पोलिस शोध घेत होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत असताना पोलिस अमंलदार धनाजी धोत्रे, सतिश मोरे, सचिन गाडे यांना शेट्टी वारजे पोस्ट ऑफीस परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्या आधारे त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. पुढील कार्यवाही साठी त्याला सहायक पोलिस आयुक्तांच्या हवाली करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments