Tuesday, July 15, 2025
Homeक्राईम न्यूजघाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट; तर पुणे-मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट; तर पुणे-मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

भारतीय हवामान खात्याने (IMD) शुक्रवारी ५ते ८ जुलै दरम्यान राज्यात विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसासह जोरदार वाऱ्याचाही इशारा दिला आहे.

घाट परिसर, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, पुणे-मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सोबतच ४५-५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे.

पुढील ४८ तासांच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कमाल आणि किमान तापमान ३१°C व २६°C च्या आसपास राहील. तसेच आज वातावरण ढगाळ राहील, काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जास्त असेल आणि काही ठिकाणी ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

कुठे-कुठे पाऊस पडणार ?

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा याठकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तर पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया. याठकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. सोबतच विदर्भात जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली. याठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments