Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजघर का भेदी लंका ढाए ! वॉचमनने मेहुण्याच्या मदतीने मालकाला घातला 24...

घर का भेदी लंका ढाए ! वॉचमनने मेहुण्याच्या मदतीने मालकाला घातला 24 लाखांचा गंडा; दोन्ही आरोपींना हडपसर पोलिसांकडून अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

हडपसर : घर का भेदी लंका ढाए! या म्हणीप्रमाणे घरात काम करणारा वॉचमनच चोर निघाला आहे. वॉचमनने मेहुण्याच्या मदतीने घरमालकाला ऑनलाईन ट्रांजेक्शनच्या माध्यमातून तब्बल 24 लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हडपसर पोलीसांनी दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

इफतीकार रहिमखान पठाण (वय 31, रा. फ्लॅट नंबर-707,7 वा मजला, रेहान पार्क, गौतम नगर, गोवंडी मुंबई) व मोहम्मद हनीफ मोहम्मद अफसर (वय 52, सध्या रा. म्हसोबा मंदिराचे पाठीमागे, काळेपडळ, हडपसर पुणे, मुळ रा. पातूर, जि. अकोला) अशी अटककरण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका व्यक्तीनेहडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल हे कुटूंबापासून वेगळे एकटेच राहत होते. त्यांना दैनंदिन गरजेच्या कामामध्ये ते राहत असलेल्या ठिकाणी वॉचमन म्हणून काम करणारा हनीफ नावाचा इसम मदत करीत होता. दरम्यान, फिर्यादी यांच्या वडिलांच्या अकाऊंन्टचा ऑनलाईन अॅक्सेस घेवून अनोळखी इसमांनी त्यांच्या खात्यामधून वेळोवेळी 24 लाख 45 हजार रुपये काढून फसवणूक केली होती.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4),3 (5), आयटी ऍक्ट 66 (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी फसवणूक झालेल्या रक्कमेची बँकेकडून माहीती प्राप्त करून त्याची पडताळणी केली असता, ती रक्कम इफ्तीकार खान आणि नुर जहाँ यांच्या बँक अकाऊंन्टवर ट्रान्स्फर झाल्याची माहिती मिळाली. तसेच वॉचमन म्हणून काम पाहणारा इसम हनीफ हा घटनेनंतर काम सोडून फरार झाला होता.

दरम्यान, तांत्रिक तपासामध्ये हनीफ आणि इफ्तीकार खान हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. संशयीत इसमाबाबत उपयुक्त माहिती गोळा करून पोलिसांनी इफ्तीकार पठाण व मोहम्मद अफसर यांना मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपींकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता, त्यांनी गुन्ह्याची पोलिसांना कबुली दिली.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मागदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, अविनाश गोसावी, संदीप राठोड, तेजस पांडे, गायत्री पवार, चंद्रकांत रेजितवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments