Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजघरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणाला अटक, कोंढव्यातील प्रकार

घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणाला अटक, कोंढव्यातील प्रकार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात एका तरुणाने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत घरात घुसून गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत तरुण जबरदस्तीने घरात घुसला. तसेच तिच्यासोबत असभ्य वर्तन करुन मोबाईलमध्ये फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी २३ वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत १३ वर्षाच्या पिडीत मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रोहित शिवाजी देवके (वय-23 रा. लक्ष्मी पार्क, महमदवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते १५ जून २०२४ या कालावधीत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी अल्पवयीन मुलगी घरात एकटीच होती. याचा गैरफायदा घेत आरोपी जबरदस्तीने घरात शिरला. त्याने मुलीला जवळ ओढून अश्लील वर्तन करून त्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे फोटो काढून विनयभंग केला. त्यानंतर मुलीचा वारंवार पाठलाग केला.

पिडीत मुलगी शिलाई मशीनच्या क्लासला गेल्यानंतर क्लासच्या बाहेर तिला आडवले. माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु माझ्यबरोबर लग्न कर, नाही तर मी तुझ्या आई-वडीलांना मारुन टाकेन. तसेच मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments