इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
तुमच्यापैकी अनेकजण असे असतील की पालींना पाहिल्यावर त्यांना भीती वाटते. पाल ही अतिशय विषारी असते. कारण, ती अनेक लहान-मोठे कीटक खाते. अशा परिस्थितीत, सर्वात मोठी चिंता म्हणजे ती अन्नपदार्थात पडण्याची शक्यता असते. त्यामुळे लोक पाल दूर करण्यासाठी विषारी रसायने वापरणे टाळतात. पण, असा एक घरगुती उपाय आहे तो पाली पळवून लावण्यात प्रभावी मानला जातो. त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला आज देत आहोत.
घरातील पाली पळवून लावण्यासाठी एक स्प्रे फायद्याचा ठरू शकतो. पण, हा स्प्रे बनवण्यासाठी कोणत्याही महागड्या सामग्रीची गरज नाही. तुमच्या घरातील काही गोष्टी एकत्र करून तो स्प्रे तुम्ही तयार करू शकता. त्यासाठी कापूर गोळी, अँटिसेप्टिक लिक्विड (डेटॉल), पाणी, स्प्रे बाटलीची गरज भासणार आहे. पाल दूर करण्यासाठी उपाय करण्यासाठी, प्रथम 3-4 कापूर गोळ्या बारीक करा आणि त्यांची पावडर तयार करा.
आता ही पावडर एका स्प्रे बाटलीत ठेवा आणि त्यात एक कप अँटीसेप्टिक लिक्विड टाका. त्यात थोडे पाणी देखील घाला. अशाप्रकारे पाल दूर करण्यासाठी तुमचा घरगुती उपाय तयार होईल. अनेकदा पाली भिंतींवर आणि छतावर बिंधास फिरताना दिसतात, मग तुम्हाला स्प्रे बाटलीच्या मदतीने भिंतींवर फवारा मारावा लागणार आहे. ज्या ठिकाणी पाली जास्त दिसतात त्या ठिकाणी फवारणी करा. अशाप्रकारे घरातून पाली पळवून लावता येऊ शकतात.