Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजघरफोडी अन् वाहनचोरी करून धुमाकूळ घालणारे दोन अल्पवयीन बालक पोलीसांच्या ताब्यात; वानवडी...

घरफोडी अन् वाहनचोरी करून धुमाकूळ घालणारे दोन अल्पवयीन बालक पोलीसांच्या ताब्यात; वानवडी पोलिसांची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वानवडी, (पुणे) : हडपसर व वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील अनेक दिवसांपासून घरफोडी व वाहनचोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांना वानवडी पोलिसांच्या तपास पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 2 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार घडणा-या घरफोडी व वाहनचोरीच्या अनुषंगाने वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी चोरी, वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणुन प्रभावी कारवाई करण्याच्या सुचना वरिष्ठांनी तपास पथकाच्या पोलिसांना दिल्या होत्या.

सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे तपास करताना पोलीस अंमलदार अमोल गायकवाड, यतीन भोसले, गोपी मदने यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्या मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने 2 विधीसंघर्षीत बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, त्यांच्याकडे अधिक कौशल्यपुर्ण तपास केला असता त्यांच्या ताब्यातुन 2 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तसेच त्यांनी हडपसर येथील 2 व वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले 6 गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यामध्ये 2 घरफोडी चोरी, 5 वाहनचोरी व 1 पाहिजे आरोपी असे गुन्हे उघडकीस आले आहे. सदर विधीसंघर्षीत बालकांना मुदतीत बाल न्यायमंडळ, येरवडा, पुणे यांचे समक्ष हजर ठेवले आहे.

सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजय पतंगे, गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक, धनाजी टोणे, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, सर्फराज देशमुख, अतुल गायकवाड, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, यतीन भोसले, गोपाळ मदने, संदीप साळवे व सोमनाथ कांबळे या विशेष पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments