Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजघरफोडीच्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलाला लोणी काळभोरमधून घेतले ताब्यात; गुन्हे शाखा युनिट 6...

घरफोडीच्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलाला लोणी काळभोरमधून घेतले ताब्यात; गुन्हे शाखा युनिट 6 ची कामगिरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणीकंद, (पुणे) : लोणीकंद व कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून पसार असलेल्या अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी (ता. 13) दुपारी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी कॉलेजच्या समोर असलेल्या ब्रीजखालून या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद व कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना घडली होती. यातील मुख्य आरोपी महेश उर्फ मह्या काशिनाथ चव्हाण, (वय 19, रा. कॅनलचे बाजुला, तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) याला गुन्हे शाखेच्या पोलिसानी शनिवारी (ता. 10) ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याने कोलवडी व कोंढवा परिसरात एका अल्पवयीन मुलासमवेत चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली होती.

सदर अल्पवयीन मुलाचा पोलीस तपास करीत असताना सदरचा मुलगा हा लोणी काळभोर येथील एमआयटी कॉलेजच्या समोर असलेल्या ब्रीजखाली असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांना मिळाली होती. सदर ठिकाणी जाऊन मिळालेल्या माहितीच्या वर्णनाच्या इसमांस ताब्यात घेऊन त्याचे नाव व वयाबाबत माहिती घेतली असता तो अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर अल्पवयीन मुलाने कोंढवा व कोलवडी येथील चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली असून पुढील कारवाई कामी वैद्यकीय तपासणी करून लोणीकंद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक युनिट 6 चे प्रताप पोमण, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सचिन पवार, शेखर काटे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, सुहास तांबेकर या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments