इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून इंधन आणि गॅस सिलेंडरच्या चोरीचे प्रमाण पुण्यामध्ये वाढत चालले आहे. अशातच आता घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस काढून बेकायदा विक्री करणाऱ्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण सुमारे 2 लाख 24 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मदन बामने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लोणी काळभोर येथील महादेव मंदिराजवळ असलेल्या साईसृष्टी बिल्डिंग पाठीमागे एका गोठ्यामध्ये आरोपी घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस काढून बेकायदा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हे शाखा युनिट सहा व लोणी काळभोर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा मदन बामने अवैधरित्या गॅस भरताना आढळून आला त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. या छाप्यात पोलिसांनी 31 हजार 900 रुपये किमतीच्या एचपी कंपनीच्या 11 कमर्शियल गॅस टाक्या, 17 हजार 150 किमतीच्या इंडेन कंपनीच्या सात घरगुती गॅस टाक्या, तेरा हजार रुपये किमतीच्या पुष्पा कंपनीच्या नऊ घरगुती वापराच्या रिकाम्या गॅस टाक्या, 51 हजार 450 रुपये किमतीच्या 21 एचपी कंपनीच्या गॅस टाक्या तसेच 19 हजार 450 रुपये किंमत असलेल्या एसपी कंपनीच्या 21 ही घरगुती वापराच्या रिकाम्या गॅस टाकीत जप्त करण्यात आल्या आहेत. यासह रिलायन्स कंपनीच्या सहा घरगुती वापराच्या गॅस टाक्या, एचपी कंपनीच्यालहान गॅस टाक्या, गॅस ट्रान्सफर करण्याचे लोखंडी नोझल, पितळी नोझल तसेच रेग्युलेटर पाईप, एक इलेक्ट्रिकल वजन काटा असा एकूण दोन लाख 2 लाख 24 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घरगुती गॅस सिलेंडरची चोरी करून बेकायदा विक्री करणाऱ्या या आरोपीच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.