Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज घटस्फोटाकरिता हुकूमनाम्यापर्यंत दोघांची सहमती आवश्यक, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

घटस्फोटाकरिता हुकूमनाम्यापर्यंत दोघांची सहमती आवश्यक, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : तब्बल २८ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी सहसंमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सहा महिने वेगळे राहण्यासाठी कूलिंग पिरिएड मिळाला. ४ महिने दोघे वेगळे राहिले. त्यानंतर पत्नीने घटस्फोट घेण्यासाठीची संमती काढून घेतली. घटस्फोटाचा दावा फेटाळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. तिच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचा दिलेला न्यायनिवाडा ग्राह्य धरून घटस्फोटाचा दावा कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी रद्द केला.

राकेश आणि वनिता (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. तो उद्योगपती आहे. ती गृहिणी आहे. दोघांना एक मुलगा, एक मुलगी आहे. वैचारिक मतभेद आणि सतत होणाऱ्या वादामुळे दोघांनी सहसंमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. त्याच्या वतीने अॅड. रोहित एरंडे, तर तिच्या वतीने अॅड. शशिकांत बागमार, अॅड. निनाद बागमार आणि अॅड. गौरी शिनगारे यांनी काम पहिले. तिला ठरलेल्या पोटगीच्या अर्धी रक्कम देण्यात आली. तसेच, दागदागिने, स्त्रीधन देण्यात आले होते. मात्र, दावा दाखल केल्यानंतर समेट घडविण्यासाठी सहा महिन्यांचा कूलिंग पिरिएड असतो. दरम्यान ४ महिने विभक्त राहिल्यानंतर तिला संसार आणि दोन्ही मुलांची ओढ लागली. ती घरात पुन्हा गेली. पत्नी म्हणून सर्व कर्तव्य पार पाडू लागली. दरम्यान, तिने घटस्फोटासाठी असलेली तिची संमती काढून घेतली. घटस्फोटाचा दावा रद्द करण्याची मागणी केली.

तिचे वकील अॅड. निनाद बागमार यांनी दाम्पत्याच्या सहसंमतीच्या घटस्फोटाच्या दाव्यात हुकूम होईपर्यंत दोघांची संमती आवश्यक आहे. दोघांपैकी एकजण कधीही संमती काढून घेऊ शकतो, अशा आशयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुरेष्ठा देवी विरुद्ध ओमप्रकाश या न्यायनिवाड्याचा दाखला दिला. या निवाड्याचा युक्तिवाद ग्राह्य धरून पत्नीची नांदण्याची तयारी असल्याने दाम्पत्याचा सहसंमतीचा घटस्फोटाचा अर्ज न्यायालयाने रद्द केला.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments