Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज ग्राहकांसाठी आनंदवार्ता, सोने-चांदीत आली स्वस्ताई

ग्राहकांसाठी आनंदवार्ता, सोने-चांदीत आली स्वस्ताई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली | 28 ऑक्टोबर 2023 : दिवाळीपूर्वीच सोने चांदीने झरझर दरवाढ केली. त्यामुळे अनेकांच्या खरेदीच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूत मोठी घसरण आली होती. दिवाळीपर्यंत त्यात आणखी घसरणीचा तज्ज्ञांचा अंदाज होता. इस्त्राईल-गाजा युद्धाने या सर्व योजनेला सुरुंग लागला. दिवाळीत जम के सोने-चांदी खरेदीची योजना बारगळली. कारण या महिन्यात दोन्ही धातूंनी (Gold Silver Price Today 28 October 2023) 4 हजारांची चढाई केली. जागतिक स्तरावर आणि वायदे बाजारात सोने तेजीत असले तरी सराफा बाजारात त्याने गिरकी घेतली.

आठवडाभरात सोन्यात तेजी

गुडरिटर्न्सनुसार, या आठवड्यात सोन्याने 500 रुपयांची चढाई केली. 23 ऑक्टोबरला किंमती 300 रुपयांनी घसरल्या होत्या. 24 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव 240 रुपयांनी वाढला. 25 ऑक्टोबर रोजी 110 तर 26 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किंमतीत 160 रुपयांची तेजी आली. शुक्रवारी भावात बदल दिसला नाही. आता 22 कॅरेट सोने 56,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,110 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.

चांदीत घसरण

या आठवड्यात चांदीत घसरण दिसून आली. 23 ऑक्टोबर रोजी भाव 200 रुपयांनी घसरले. 24 ऑक्टोबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. तर 26 ऑक्टोबर रोजी चांदीने 500 रुपयांची चढाई केली. 27 ऑक्टोबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,984 रुपयांहून 60,825 रुपयांवर घसरले. 23 कॅरेट 60,740 रुपयांहून 60,581 रुपयांवर आले. 22 कॅरेट सोने 55,861 रुपयांहून 55,716 रुपयांपर्यंत खाली आले. 18 कॅरेट 45,619 रुपये, 14 कॅरेट सोने 35,583 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीत 654 रुपयांची घसरण झाली. भाव 70,906 रुपयांपर्यंत घसरले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments