Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज गोळ्या झाडून खून, गुंडांवर मोक्का; आता कोठडीचीच खा हवा!

गोळ्या झाडून खून, गुंडांवर मोक्का; आता कोठडीचीच खा हवा!

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : घोरपडे पेठेत दहशत माजवून परप्रांतीय कामगारावर गोळ्या झाडून खून केला. या प्रकरणी टोळीप्रमुख नवनाथ लोधासह साथीदारांविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.

नवनाथ ऊर्फ नब्बा सुरेश लोधा (वय ३७, घोरपडे पेठ), गणेश उल्हासराव शिंदे (वय ४२, रा. चव्हाणनगर, धनकवडी), रोहित संपत कोमकर (वय ३३, रा. गुरुवार पेठ), अमन दीपक परदेशी (वय २९, रा. घोरपडे पेठ) अशी या गुंडांची नावे आहेत.

लोधा आणि साथीदारांनी गेल्या महिन्यात परप्रांतीय मजुरावर पिस्तुलातून गोळीबार करुन त्याचा खून केला होता. लोधा आणि साथीदारांविरुद्ध यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे लोधासह साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव खडक ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने, गुन्हे शाखेचे निरीक्षक संपतराव राऊत, सहायक निरीक्षक राकेश जाधव, उपनिरीक्षक अतुल बनकर आदींनी तयार केला. संबंधित प्रस्तावास अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविला.

पोलिस आयुक्तांनी या प्रस्तावास मंजुरी देऊन मोक्का कारवाईचे आदेश दिले. रितेश कुमार यांनी पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरातील ८९ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments