Saturday, November 23, 2024
Homeक्राईम न्यूजगोमांस विक्री करणाऱ्या चार दुकानांवर पोलिसांचा छापा; 292 किलो गोमांस जप्त, शिरुर...

गोमांस विक्री करणाऱ्या चार दुकानांवर पोलिसांचा छापा; 292 किलो गोमांस जप्त, शिरुर पोलिसांची कामगिरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रांजणगाव गणपती : शिरुर शहरातील इस्लामपूर येथे गोमांस विक्री करणाऱ्या चार दुकानांवर शिरूर पोलिसांनी छापा टाकून 292 किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल केले आहे. याबाबत निखील भिमाजी रावडे (पोलीस कॉन्स्टेबल शिरूर पोलीस स्टेशन), यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत शौकत इस्माईल कुरेशी (वय 42 वर्ष), हनिफ युसुफ शेख (वय 65), इसराल इक्बाल कुरेशी (वय 39) मुजीफ जलील कुरेशी (सर्वरा. ईस्लामपुरा, हजरत गौसुल आजम दस्तगीर दर्गाजवळ शिरूर ता. शिरूर जि पुणे.) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीप्रमाणे, (दि.22 सप्टेंबर) रोजी साडेबारा ते दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान शिरूर इस्लामपुरा येथील हजरत गौसुल आजम दस्तगीर दर्गाजवळ आरोपी यांच्या दुकानांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले गोमांस विक्री करित असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. या ठिकाणी असणाऱ्या चार दुकानावर छापा टाकला असता त्यांना शौकत याच्या दुकानात 56 किलो गोमांस, हनिफकडे 48 किलो गोमांस, इसरालकडे 63 किलो गोमांस, मुजिफ दुकानात 125 किलो गोमांस हे त्यांच्या दुकानांमध्ये विक्रीस ठेवलेले आढळून आले. हे सर्व गोमांस एकुण 292 किलो ग्रॅम वजनाने 35 हजार 40 रूपये किंमतीचे गोमास विक्री करीत असताना मिळुन आले आहे.

पोलिसांनी हे गोमांस जप्त केले आहे. तर मुजीफ जलील कुरेशी हा सदर ठिकाणहुन पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला आहे. फिर्यादीवरून वरील 4 आरोपी विरूद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 (क), 9 (अ) प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक हनुमंत गिरी करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments