Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज गोडाऊन मधून मोबाईल चोरणाऱ्या डिलिव्हरी बॉयला बेड्या: कारची काच फोडून 1 लाख...

गोडाऊन मधून मोबाईल चोरणाऱ्या डिलिव्हरी बॉयला बेड्या: कारची काच फोडून 1 लाख 20 हजारांचा मुद्देमाल लंपास

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

गोडाऊन मधून विविध कंपन्यांचे १० लाख १४ हजारांचे किंमतीचे २८ मोबाईल चोरणाऱ्या डिलिव्हरी बॉयला भारती विद्यापीठ पोलीस अटक केली.

ऋषिकेश राजेंद्र कुंभार (वय२३, रा. आंबेगाव पठार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल जाधव (वय-२१, रा. शिवनेरी नगर, कोंढवा) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ऑक्टोबर २०२३ ते ५ फेब्रुवारी दरम्यानच्या काळात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी विशाल जाधव यांचे धनकवडी येथे इन्सकार्ट नावाने कुरियर सर्व्हिस असून ऑनलाईन वस्तू विक्री करणाऱ्या नामांकित कंपनीच्या वस्तू ग्राहकांना देण्याचे काम करत असतात. यासाठी विशाल जाधव यांचेधनकवडी येथे गोडावून असून आरोपी ऋषिकेश कुंभार हा येथे डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला होता. आरोपीने गोडावून मधील विविध कंपन्यांचे १० लाख १४ हजार ३९ रुपयांचे २८ मोबाईल चोरून नेल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे करत आहेत.

कारची काच फोडून १ लाख २० हजारांचा मुद्देमाल लंपास पार्किग मध्ये लावण्यात आलेल्या कारच्या दरवाज्याची काच फोडून १ लाख २० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार गुलटेकडी येथे घडला.

याप्रकरणी एका ३२ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अप्सरा टॉकीज समोरील गुलटेकडी येथील एका पार्किंग मध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिला आपली कार लावून खरेदीसाठी गेल्या असता चोरट्याने कारच्या पाठीमागील दरवाज्याची काच फोडून पर्स मधील सोन्याचे दागिने, एटीएम, क्रेडिट कार्ड, हेडफोन, ३० हजारांची रोख रक्कम असा १ लाख २० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादेत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार खोमणे करत आहेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments