Sunday, December 10, 2023
Home क्राईम न्यूज गेल्या 10 आठवड्यात 1.44 लाख कोटी घटली परकीय गंगाजळी, कशी काय ते...

गेल्या 10 आठवड्यात 1.44 लाख कोटी घटली परकीय गंगाजळी, कशी काय ते पाहा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : भारताची परकीय गंगाजळी सातत्याने कमी होत चालली आहे. गेल्या लागोपाठच्या दहा आठवड्यात भारताचे विदेशी चलन भांडार घटत चालले आहे. परकीय गंगाजळीत 1.44 लाख कोटीहून अधिक घट झाल्याचे • आकडे सांगत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे परकीय गंगाजळी सहा महिन्यांच्या निच्चांक पातळीवर पोहचली आहे. 6 ऑक्टोबर 2023 रोजी संपलेल्या आठवड्यात विदेशी चलनाचा साठा 2.16 अब्ज डॉलरच्या घसरणीसह 584.75 अब्ज डॉलरवर पोहचला आहे. त्याच्या ● आधीच्या आठवड्यात तो 586.908 अब्ज डॉलर पोहचला होता.

परदेशी गुंतवणूकदारांच्या शेअर विक्रीमुळे परदेशी चलनसाठ्यात घसरण होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने शुक्रवारी परदेशी चलनसाठ्याची आकडेवारी जारी केली होती. त्यामुळे परकीय गंगाजळी 2.16 अब्ज डॉलर घटून 584.75 अब्ज डॉलरवर आले आहे. त्याआधीच्या आठवड्यात देशाची एकूण परकीय गंगाजळी 3.79 अब्ज डॉलरने घसरण होऊन 586.91 अब्ज डॉलर झाले होते. ऑक्टोबर 2021 मध्ये देशाची परकीय गंगाजळी 645 अब्ज डॉलर या आतापर्यंतच्या उच्च पातळीवर पोहचली होती. गेल्यावर्षी जागतिक घटनाक्रमाच्या दबावाने आरबीआयने रुपयाची विनियम दरातील घसरण रोखण्यासाठी या गंगाजळीचा वापर केला होता. त्यामुळे परकीय चलनाचे भंडार घटले आहे.

राखीव सोन्याच्या साठ्यात घसरण

रिझर्व्ह बँकेच्या साप्ताहिक आकड्यांनुसार 6 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा महत्वाचा हिस्सा असलेले परदेशी चलन असेट्स 70.7 कोटी डॉलर घसरुन 519.53 अब्ज डॉलर झाले होते. गोल्ड रिजर्व्हचे मुल्या 1.42 अब्ज डॉलर घटून 42.31 अब्ज डॉलर झाले आहे.

RELATED ARTICLES

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी २ महिलांसह चौघांवर गुन्हा; एकाला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : 'स्पार्कल कँडल' बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याप्रकरणी जागा मालक, कारखाना चालक तसेच दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला....

Recent Comments