Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजगॅरेजला लागलेल्या आगीत १७ चारचाकी वाहने जळून खाक

गॅरेजला लागलेल्या आगीत १७ चारचाकी वाहने जळून खाक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बिबवेवाडी – आई माता मंदिरा मागील गॅरेजला शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत आलिशान मोटारींसह गॅरेज मधील जुन्या गाड्या जळून खाक झाल्या. गॅरेज शेजारी मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात गवताला आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून गंगाधाम, कोंढवा खुर्द आणि दोन वॉटर टँकर रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, सदर ठिकाणी मोकळ्या जागेत असलेल्या गॅरेजमधील गाड्यांना आग लागल्याचे निदर्शनास येताच जवानांनी आतमध्ये कोणी कामगार नसल्याची खात्री करत चारही बाजूने पाण्याचा मारा करत सुमारे तीस मिनिटात आग आटोक्यात आणत कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवले व आग पुर्ण विझवली.

आगीमध्ये गॅरेजमधील एकुण १७ चारचाकी वाहने जळाली असून यामध्ये बीएमडब्ल्यु, मर्सिडीज, रेंज रोव्हर, स्कोडा, हुंदाई, फोर्ड या कंपन्याची वाहने दुरुस्तीकरिता आले असल्याचे समजले. तसेच सदर गॅरेजचे नाव हे मतीन कार केअर्स असे आहे, आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जखमी वा जिवितहानी झाली नाही.

आग लागण्याचे कारण स्पष्ट होत नसल्याचे अग्निशमन अधिकारी संजय रामटेके यांनी सांगितले, आग विझविण्यासाठी चार बंब, दोन टँकरचा वापर करत कैलास शिंदे, तांडेल मनीष बोंबले, महादेव मांगडे, फायरमन शैलेश गोरे, राजेश घडशी, निलेश वानखडे, वैभव राऊत, कुणाल खोडे, मंदार नलावडे यांच्यासह सहकाऱ्यांनी आग आटोक्यात आणली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments