इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुरंदर : गुरोळी (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी जीवन खेडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रेणुका खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या विशेष बैठकीत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.
उपसरपंच पदासाठी जीवन खेडेकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे, निवडणूक अधिकारी नीलिमा धोत्रे यांनी जीवन खेडेकर यांची बिनविरोध निवड घोषित केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेश भोसले, संदीप खेडेकर, मोहिनी खेडेकर, उज्वला जाधव, शितल खेडेकर उपस्थित होते. विद्यमान उपसरपंच जीवन खेडेकर यांचा सत्कार माजी सरपंच हिरामण खेडेकर, मनोहर खेडेकर, प्रकाश खेडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष खेडेकर, विलास जगताप, माऊली मेमाने, पांडुरंग खेडेकर, चंद्रकांत दादा खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला
गावच्या ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्वसामान्यांना शासनाच्या लाभापासून वंचित न ठेवता प्रत्येकापर्यंत लाभ मिळून देणार असल्याचे विद्यमान उपसरपंच जीवन खेडेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर खेडेकर व आभार दत्तात्रय खेडेकर यांनी मानले.