इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्याच्या विविध भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. तसेच नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन देखील केले आहे.
वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत बालेवाडी जकात नाका टाकी, सन हॉरिझोन टाकी, बाणेर वेस्ट टाकी, पाषाण लेक टाकी, लोकसेवा सूस-पाषाण-बाणेर लिंक रोड टाकी, पॅनकार्ड क्लब रोड टाकी येथे मुख्य पाण्याच्या लाइनला नव्याने टाकण्यात आलेल्या लाइन जोडणे व व्हॉल्व बसविणे तसेच भामा आसखेड प्रकल्पांतर्गत पाणी वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्या विभागात पाणी पुरवठा बंद राहणार?
बालेवाडी, बाणेर, पाषाण, बावधन, शास्त्रीनगर, डुक्करखिंड, शांतीबन, सुस रोड, मोहननगर, पंचवटी, म्हाळुंगे, परमहंसनगर, भारतीनगर, सुरजनगर, चिंतामणी सोसायटी, व्यू लक्ष्मीनगर, गुरूगणेशनगर, सारथी शिल्प, पूजा पार्क, निम्हणमळा, लम्हाण तांडा, बाणेर गावठाण, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, विजयनगर, मेडीपॉईंट रोड, आंबेडकर नगर, दत्तनगर, चाकणकर मळा, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, धानोरी, वडगाव शेरी, खराडी, विमाननगर, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, येरवडा, संजय पार्क, लोहगाव, बोराटे वस्ती, शेजवळ पार्क याठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.