Saturday, June 14, 2025
Homeक्राईम न्यूजगुरं बांधण्यासाठी गोठ्यात गेलेल्या 16 वर्षीय युवकाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू

गुरं बांधण्यासाठी गोठ्यात गेलेल्या 16 वर्षीय युवकाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

ठाणे: ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातील इंदे गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलाचा अंगावर वीज पडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. यश रमेश लाटे (रा. इंदे) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. युवकाचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

ही दुर्दैवी घटना काल (25 मे) सायंकाळच्या वेळी घडली. यशने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. तो पुढील शिक्षणाची तयारी करत होता. दरम्यान, मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे यश गुरे बांधण्यासाठी गोठ्यात गेला होता. तेंव्हा काल (25 मे) रोजी सायंकाळच्या वेळी ही दुर्देवी घटना घडली.

दरम्यान, गावकऱ्यांनी यशच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्याची प्रशासनाकडे मागणी केली आहे. मागील काही दिवसांपासून मुरबाड तालुक्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments