Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजगुन्हेगाराची माहिती पोलिसांना दिल्याचे रागातून ज्येष्ठासह दोघांवर तलवारीने वारः 11 आरोपींवर ...

गुन्हेगाराची माहिती पोलिसांना दिल्याचे रागातून ज्येष्ठासह दोघांवर तलवारीने वारः 11 आरोपींवर वानवडी ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

दरोडा व चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची माहिती पोलीसांना देत असल्याच्या संशयातून एका ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर ११ जणांच्या टोळक्याने वानवडी परिसरातील रामटेकडी भागात कोठारी व्हिल्स याठिकाणी एका ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर तलवारीने वार करुन त्यांना जखमी केले. तर रस्त्यावरील सार्वजनिक ठिकाणी पार्क करण्यात अालेल्या वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी ११ अारोपीवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

याबाबत पंजाबसिंग फौजिसिंग कल्याणी (वय-६५, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात अारोपी विरोधात तक्रार दिली आहे. यावरून रविसिंग शामसिंग कल्याणी, हुकूमसिंग रामसिंग कल्याणी, रामसिंग मोहनसिंग कल्याणी, अजयसिंग हुकूमसिंग कल्याणी, ऐलानसिंग रामसिंग कल्याणी, जिंदालसिंग रामसिंग कल्याणी, हिंदूसिंग रामसिंग कल्याणी, राजूसिंग रामसंग कल्याणी, निहालसिंग शामसिंग कल्याणी, सोनिहालसिंग शामसिंग कल्याणी, बसंतीकौर शामसिंग कल्याणी यांच्यावर आर्म अॅक्ट सह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार एकमेकांच्या घराशेजारी राहतात. चोरी व दरोडा घालत असताना त्याची माहिती पोलिसांना देतो असा समज करुन आरोपींनी कटकारस्थान करुन बेकायदेशीर जमाव जमवला. त्यांनी त्यांच्या हातातील लोखंडी तलवार व इतर हत्यारे घेऊन तक्रारदार यांना शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच आरोपी रविसिंग कल्याणी याने तक्रारदार यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात व पायावर तलवारीने वार करुन जखमी केले.

तर आरोपी हुकूमसिंग कल्याणी याने तक्रारदार यांच्या नातवाच्या डोक्यात तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. हातातील हत्यारे हवेत उंचावून ‘आज यांची विकेटच पाडायची, कोणी त्यांना सोडवण्यास आले तर त्यांचीही विकेट टाकू. आम्ही इथले भाई आहोत, कोणाला सोडणार नाही’ अशी धमकी आरोपींनी दिली. तसेच तक्रारदार यांच्या मुलाच्या व नातवाच्या दुचाकीवर दगड व विटा मारून नुकसान करुन इतर वाहनांची देखील तोडफोड करुन परिसरात दहशत पसरवली. आरोपींनी केलेल्या दगडफेकीमध्ये फिर्यादी यांच्या मुलाला व नातवाला मुका मार लागला. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी ऐलानसिंग कल्याणी हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खोपोली, रायसनी, नेरळ पोलिस ठाण्यात ९ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments