Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजगुन्हा दाखल न करण्यासाठी मागितले होते पैसे: जमीन प्रकरणात एसीपीच्या सांगण्यावरून...

गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितले होते पैसे: जमीन प्रकरणात एसीपीच्या सांगण्यावरून एक लाखांची लाच घेताना खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी-चिचवड आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्ताच्या (देहुरोड विभाग) सांगण्यावरून गुन्हा न दाखल करण्यासाठी खासगी व्यक्तीने 1 लाखांची लाच स्विकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात बेड्या ठोकत त्याच्यावर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ओंकार भरत जाधव (32, रा. वस्तुविवा सोसायटी, वाकड मुळ रा. अकोले ता. अकोले, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत. याबाबत एका 32 वर्षीय तक्रारदाराने कोरेगावपार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दाखल गुन्ह्यानुसार, अटक करण्यात आलेला ओंकार जाधव चालक म्हणून काम करतो. तो मुळचा अकोला येथील असून त्याची आणि सहायक पोलिस आयुक्त मुगुटलाल पाटील यांची पूर्वी पासून ओळख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तक्रारदार यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील देहुरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज आला होता. कात्रज-कोंढवा बायपास रोडवरील एका जागेसंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासंबंधीचा हा तक्रार अर्ज होता. त्याची चौकशी पाटील हे करत होते.

दरम्यान, अर्जानुसार तक्रारदारावर गुन्हा न दाखल करणसाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी 5 लाखांच्या लाचेची मागणी मुगुटलाल पाटील यांच्या सुचनेवरून ओंकार जाधव याने केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. त्यानुसार एसीबीने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. यावेळी कोरेगावपार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत 5 लाखांपैकी 1 लाखांचा हप्ता स्विकारताना ओंकार जाधव याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुन्हा एकदा पोलिस दलातील खाबुगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments