Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूज"गुणवंत विद्यार्थ्यांवरच देशाचे भविष्य अवलंबून"; सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांचे प्रतिपादन

“गुणवंत विद्यार्थ्यांवरच देशाचे भविष्य अवलंबून”; सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांचे प्रतिपादन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर : ‘आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचे भविष्य घडविणारा आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांवरच देशाचे भविष्य अवलंबून आहे,’त्यामुळे विद्यार्थी हा हुशार, निरोगी, सदृढ, मेहनती असायला पाहिजे. तर व्यसनापासून अलिप्त असला पाहिजे. असे प्रतिपादन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी केले.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे “जागतिक आमली पदार्थ विरोधी दिन ” निमित्त इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे बुधवारी (ता.27) आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी केले. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे गोपनीय हवालदार रामदास मेमाणे, रवी आहेर, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नरसिंह जाधवर, पर्यवेक्षिका रेखा पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना किशोर पवार म्हणाले की, विद्यार्थी व तरुणवर्ग हा अमली पदार्थाच्या विळख्यात सापडला आहे. अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थाच्या सेवनाने दोघांचा मृत्यू झाला आहे. विमानतळावर तीन कोटींचे ड्रग्ज सापडले. अशा बातम्या आपण रोज वर्तमानपत्रात व न्यूज चॅनेलवर वाचतो अथवा ऐकतो. म्हणजे अमली पदार्थांच्या सेवनाने किती दुष्परिणाम होतात. ते आपल्याला या माध्यमातून समजते.

आपले जीवन सुंदर आहे. ते एकदाच मिळत असते. अमली पदार्थांपासून दूर राहून आपले जीवन सुंदर बनवा. आरोग्याला महत्त्व द्या. व्यायाम करा. खेळ खेळा. पण अमली पदार्थांना थारा देऊ नका. असेही किशोर पवार यांनी विद्यार्थ्यांना यावेळी आवाहन केले.

दरम्यान, यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. तर या कार्यशाळेसाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सीताराम गवळी यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments