Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज गुणरत्न सदावर्ते यांचा एसटी महामंडळात कामबंदचा इशारा फोल, आता.....

गुणरत्न सदावर्ते यांचा एसटी महामंडळात कामबंदचा इशारा फोल, आता…..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे | 6 नोव्हेंबर 2023 : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा दीर्घ संप वर्षापूर्वी झाला होता. आता दिवाळीच्या तोंडावर पुन्हा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाकडून ६ नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली. परंतु त्यांच्या या हाकेला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला दिसत नाही. राज्यातील सर्वच विभागात एसटीची सेवा सुरळीत सुरु आहे. यामुळे सदावर्ते यांनी पुकारलेला संप फसला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचवेळी शासनाकडून या संपाच्या हाकेनंतर पावले उचलली गेली आहे. राज्य शासनाने आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत बैठक बोलवली आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.

गुणरत्न सदावर्तेच्या एसटी कष्टकरी जनसंघाकडून ६ नोव्हेंबरपासून अनेक मागण्यांसाठी एसटी महामंडळात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतरही कामबंद आंदोलनाला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला दिसत नाही. राज्यात सर्वत्र एसटीची वाहतूक सुरळीत सुरु आहे. मोडकळीस आलेल्या गाड्या, सातवा वेतन आयोग लागू करणे, शिस्त आवेदन पद्धत रद्द करणे, दिवाळी बोनस आणि वाढीव महागाई भत्ता देणे हे प्रमुख मुद्यांसाठी काम बंद पुकारले होते.

राज्य सरकारकडून चर्चेची तयारी

एसटी कष्टकरी जनसंघाकडून आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने पावले उचलली आहे. सरकारने गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत बैठक बोलवली आहे. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. ऐन दिवाळीत प्रवाशांना फटका बसू नये यासाठी सरकारकडून मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली आहे. दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सेवाशक्ती संघटनेकडून देखील आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या

• सातव्या वेतन आयोगानुसार एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांना पगार वाढ मिळाली आहे. परंतु चालक, वाहक, मेकॅनिक यांना पगारवाढ दिली गेली नाही. त्यांनाही सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ मिळावी.

• महाविकास आघाडी सरकार असताना एसटीच्या

विलीनीकरण संदर्भात समिती नेमली होती. ती समिती रद्द करून नव्याने समिती गठीत करावी •

राज्य सरकारने ४२% महागाई भत्ता दिला आहे. मात्र २०१६ पासून थकीत देयक दिलेली नाही. ती त्वरित मिळावी.

• मोटर व्हेइकल ऍक्ट नुसार एसटी मधील ८५% गाड्या रद्दबादल आहेत. त्यामुळे नवीन इलेक्ट्रिकल गाड्या आणाव्यात आणि त्यावरती एसटी महामंडळाचे चालक,

वाहकांची नेमणूक करावी.

• एसटी महामंडळाच्या प्रत्येक गाडीचे इन्शुरन्स काढावे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments