Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज गुगल मॅपवर बदललं देशाचं नाव; सर्च केल्यावर पहा काय दिसतंय?

गुगल मॅपवर बदललं देशाचं नाव; सर्च केल्यावर पहा काय दिसतंय?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : 30 ऑक्टोबर 2023 | सरकारने देशाचं नाव ‘इंडिया’वरून ‘भारत’ करण्याचे संकेत दिले होते. त्यावरून बरंच राजकारणसुद्धा झालं होतं. ‘इंडिया’ हे देशाचं इंग्रजी नाव बदलून अद्याप अधिकृतरित्या ‘भारत’ करण्यात आलं नाही. मात्र गुगल मॅपने या नव्या नावाचा आधीच स्वीकार केल्याचं पहायला मिळतंय. जर तुम्ही गुगल मॅपवरील सर्च बॉक्समध्ये ‘भारत’ असं टाइप केलात तर तुम्हा ‘दक्षिण आशियातील एक देश’ म्हणून तिरंगा झेंडा दिसून येईल. तुम्ही तुमच्या गुगल मॅपची भाषा हिंदी किंवा इंग्रजी ठेवली असली तरी त्याने काहीच फरक पडत नाही. जर तुम्ही भारत असं हिंदी किंवा इंग्रजीत टाइप केलं तरी तुम्हाला गुगल रिझल्ट म्हणून ‘इंडिया’च दिसेल. याचाच अर्थ गुगल मॅपने इंडिया आणि भारत या दोन्ही शब्दांना ‘दक्षिण आशियातील एक देश’ म्हणून मान्यता दिली आहे.

गुगल मॅपवर सर्च करून पहा..

युजर्सना जर भारताचा अधिकृत नकाशा गुगल मॅपवर पाहायचा असेल तर ते इंग्रजी किंवा हिंदीत गुगल मॅपवर भारत किंवा इंडिया असं लिहून सर्च करू शकतात. या दोन्ही शब्दांचं एकच उत्तर गुगल मॅप देतंय. गुगल मॅपच्या हिंदी व्हर्जनवर जर तुम्ही भारत असं टाइप करत असाल, तर तुम्हाला भारताच्या नकाशासोबतच ‘भारत’ असं बोल्डमध्ये लिहिलेलं दिसून येईल. जर तुम्ही गुगल मॅपच्या इंग्रजी व्हर्जनमध्ये ‘Bharat’ असं टाइप करत असाल, तर तुम्हा सर्च रिझल्टमध्ये देशाच्या नकाशासोबतच ‘India’ असं लिहिलेलं दिसून येईल. म्हणजेच गुगल मॅपने भारताला इंडिया म्हणून स्वीकारलं आहे. एकीकडे सरकारने देशाचं नाव बदलण्याचे संकेत दिले असतानाच आता गुगलनेही आपला होमवर्क सुरू केला आहे.

विशेष म्हणजे फक्त गुगल मॅप्सच नाही, तर टेक कंपनीच्या इतर प्लॅटफॉर्म्सवरही तुम्ही जर भारत किंवा इंडिया टाइप करत असाल, तर दोन्हींचं उत्तर एकच मिळेल. गुगल सर्च, गुगल ट्रान्सलेटर, गुगल न्यूज यांसारख्या अॅप्सवर जाऊन भारत किंवा इंडिया लिहिलं, तरी त्याचं उत्तर एकच मिळतंय. याबाबतीत अद्याप गुगलकडून कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments