Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल सांगत २७ लाखांचा गंडा

गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल सांगत २७ लाखांचा गंडा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल असे आमिष दाखवून एकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. १६) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत आंबेगाव खुर्द परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. प्रवीण दगडु पाटील असे फिर्यादीत नाव आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार हा प्रकार ११ नोव्हेंबर २०२३ ते १६ जानेवारी २०२४ यादरम्यान घडला आहे. नम्रता नावाच्या महिलेने फिर्यदिंना व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. पार्ट टाइम जॉब ‘वर्क फ्रॉम होम’ द्वारे चांगले पैसे कमावता येतील असा मेसेज केला. टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात मोबदला मिळेल असे सांगितले. त्यांनतर टेलिग्राम ग्रुपमध्ये अॅड करून वेगवेगळे टास्क दिले. सुरुवातीला टास्क पूर्ण केल्याचा चांगला मोबदला दिला आणि फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादिंना वेगवेगळी कारणे सांगत पैशांची गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल असे सांगितले. तब्बल २७ लाख ४२ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरूनही परतावा न मिळाल्याने भारती पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिघावकर करत आहेत.

 

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments