Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजगुंतवणुकीवर 333 टक्के परताव्याचे दिले आमिषः अन् तब्बल 44 लाखांची केली...

गुंतवणुकीवर 333 टक्के परताव्याचे दिले आमिषः अन् तब्बल 44 लाखांची केली फससवणूक; सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मॉर्गन स्टॅनली कंपनीच्या मध्ये गुंतवणुक केल्यास संबंधित गुंतवणुकीवर तब्बल ३३३ टक्के पर्यंत परतावा मिळेल असे सांगून एका व्यवसायिकाकडून लाखो रुपयांची अॉनलाइन गुंतवणुक घेण्यात अाली. सुरुवातीला काही रक्कम परत करुन व्यवसायिकाचा विश्वास संपादन करुन, त्यानंतर अधिकची गुंतवणुक करुन घेत तब्बल ४४ लाखांची ऑनलाइन फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मॉर्गन स्टॅनली नावाचे कंपनीचे ए९ मॉर्गन अारएमग्रुप अॅडमीन शामस कपुर व विविध बँक खातेधारक यांचेवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडे याबाबत तक्रार दाखल केलेल्या तक्रारीनुसार सदरचा प्रकार १७/१/२०२४ ते २६/२/२०२४ यादरम्यान घडला अाहे. तक्रारदार हे इन्स्टाग्रामवर रिल पाहत असताना त्यांना मॉर्गन स्टील नावाचे कंपनची एक गुंतवणुकीची जाहिरात दिसली. त्यानुसार त्यांनी जाहिरातीवर क्लिक केल्यावर ए९ मॉर्गन अारएम ग्रुप मध्ये ते जॉईन झाले असता, सदर ग्रुपचे माध्यमातून अामचे कंपनीत गुंतवणुकदार यांना गुंतवणुकीबाबत माहिती देऊन ३३३ टक्के पर्यंत परतावा मिळून देतो असे सांगण्यात अाले.

त्यांचे व्हीएमएस नावाचे अॅपला सर्व व्यैक्तिक माहिती भरुन रिजस्ट्रेशन करुन अॉनलाईन गुंतवणुक करण्यास सांगण्यात अाले. त्याप्रमाणे ए मॉर्गन अारएमपी / कस्टमर सर्व्हिस सेंटर या ग्रुपवर प्राप्त विविध बँक खात्यता तक्रारदार यांनी ३४ लाख रुपये भरले. त्यावर त्यांना एक कोटी एक लाख ८५ हजार रुपयांचा फायदा झाला असे व्हीपी- एम अॅपवर तक्रारदार यांना दिसत होते. प्रथम गुंतवणुकीवर विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना अारोपींनी सव्वालाख रुपये परत दिले. त्यानंतर तक्रारदार यांनी वेळोवेळी एकूण रुपये ४४ लाख रुपये गुंतवणुक केली. सदर गुंतवणुक केलेली रक्कम व त्यावरील परतावा न देता विश्वासघात करुन तक्रारदार यांची सदर रकमेची अॉनलाईन फसवणुक करण्यात अाली. याबाबत सांगवी पोलीस पुढील तपास करत अाहे.

२०० टक्का नफा अमिषाने ३४ लाखांचा गंडा

अौंध परिसरात राहणाऱ्या नचिकेत महादेव राऊत (वय-३४) यास अनोळखी व्यक्तींनी संर्पक करुन स्टॅक ट्रेडिंग मध्ये २०० टक्के नफा मिळवता येऊ शकतो असे अमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारक व बँक खाते वापरकर्ते यांनी त्यांना विविध खात्यावर ३४ लाख रुपये भरण्यास भाग पाडून कोणत्याही प्रकारचा परतावा परत न करता, सदर रकमेची फसवणुक करण्यात अाली अाहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात मेलिसा, नताशा, रामजी टिचर नावाचे मोबाईल धारक यांचेवर अार्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात अालेला अाहे. याबाबत पुढील तपास चतुश्रृंगी पोलीस करत अाहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments