Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजगुंतवणुकीच्या बहाण्याने महिलेची 5 लाखांची फसवणूकः तर बँक रिवार्ड तपासायचे सांगून केली...

गुंतवणुकीच्या बहाण्याने महिलेची 5 लाखांची फसवणूकः तर बँक रिवार्ड तपासायचे सांगून केली 5 लाखांची फसवणूक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

जिम मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची ५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रेरणा शिवाजी ढाकणे (वय-२९, रा. शिंदे डेअरी जवळ, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून झेउर रेहमान आणि इतरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ मार्च २०२० ते ५ ऑक्टोबर २०२२ दरम्यानच्या काळात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी झेउर रेहमान हे फिक्शन फिटनेस जिमचे मालक आहेत. फिर्यादी प्रेरणा ढाकणे आणि झेउर रेहमान यांची ओळख झाली होती. झेउर रेहमान याने फिर्यादी महिलेला जिम मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ५ ल; लेख रुपये गुंतवणूक करायला सांगितले. फिर्यादी यांनी झेउर रेहमान यांच्या पत्नीच्या बँक खात्यावर गुंतवणुकीसाठी ५ लाख रुपये पाठवले. आरोपीने हे पैसे जिम मध्ये गुंतवणूक करून परतावा न देता फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस रेवले करत आहेत.

बँक रिवार्ड तपासायचे सांगून फसवणूक

बँकेतून बोलत असून तुमच्या खात्याचे रिवार्ड तपासायचे असल्याचे सांगून सायबर चोरट्याने एका व्यक्तीची २ लाख १४ हजार ८६५ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादत नमूद केले आहे. याप्रकरणी महेश शिवराम कांबळे (वय-५८, रा. गंगाधाम, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्या विरुद्ध फसवणुकीसह आयटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सायबर चोरट्याने फिर्यादी महेश कांबळे यांच्याशी संपर्क करून ऍक्सिस बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असून बँकरिवार्ड पॉईंट रीड करण्यासाठी मोबाईलवर एक लिंक पाठवण्यात येत असून त्याच्यावर क्लिक करण्यास सांगून फिर्यादी यांच्या बँक खात्यातून परस्पर २ लाख १४ हजार ८६५ रुपये काढून घेत फसवणूक केल्याचे फिर्यादत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) एन खिलारे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments