इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी २६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ११) गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार तरुण कोंढव्यातील भागोदयनगर परिसरात वास्तव्याला आहे. सायबर चोरट्यांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर सप्टेंबर महिन्यात संपर्क साधला.
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्याला दाखविले. त्याला भूलून तरुणाने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला. त्यामुळे तरुणाच्या विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्याला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार गेल्या चार महिन्यांत त्याने वेळोवेळी २६ लाख जमा केले.