Tuesday, February 27, 2024
Home क्राईम न्यूज गुंड शरद मोहोळ हत्याकांड: पुणे पोलिसांनी केले 16 हजार ऑडिओ क्लिप्सचे विश्लेषण,...

गुंड शरद मोहोळ हत्याकांड: पुणे पोलिसांनी केले 16 हजार ऑडिओ क्लिप्सचे विश्लेषण, पुराव्याच्या अनुषंगाने नवी माहिती हाती

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात सराईत गुन्हेगार विठ्ठल शेलार व गणेश मारणे या मुख्य सुत्रधारांसह एकूण 16 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. सदर गुन्ह्याची मोठी व्याप्ती पाहता, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपींवर मोक्का अंर्तगत कारवाई केली आहे. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमधून एकमेकांशी संवाद साधलेल्या 16 हजार ऑडिओ क्लीप आढळल्या आहेत. या क्लीप्सचे तांत्रिक विश्लेषण करत असताना पुराव्याच्या अनुषंगाने नवीन महत्वपूर्ण माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्या आधारावर या प्रकरणी आणखी काही जणांवर कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिलेत.

शरद मोहोळ याचा खूनाचा कट आरोपींनी नेमका कशाप्रकारे रचला? त्याचे नियोजन कसे केले? याबाबतचे संभाषण पुरावे संबंधित ऑडिओ क्लीपमधून प्राप्त झालेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेल्या सराईत गुन्हेगार विठ्ठल शेलार याने शरद मोहोळ याच्या खुनासाठी काही रक्कम देखील इतर हल्लेखोर आरोपींना दिली असल्याचे तपासात समोर आले आहे. शरद मोहोळ याचा 5 जानेवारी रोजी कोथरुड परिसरात सुतरदरा येथे त्याचा सहकारी मुन्ना पोळेकर व साथीदारांनी जवळून गोळ्या झाडून खून केला होता. या गुन्ह्याची घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाली होती.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासात 2 वकिलांसह एकूण 16 जणांना आतापर्यंत अटक केलेली आहे. सदर आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांची पुन्हा पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. या दरम्यान पोलिसांच्या हाती या ऑडिओ क्लिप्सच्या माध्यमातून महत्त्वाचा पुरावा लागला आहे. या सर्व क्लिप्सचे विश्लेषण करून पुरावे गोळा केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी या प्रकरणी दिली.

RELATED ARTICLES

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

फायनान्सची वसुली करणाऱ्यांकडून रिक्षा चालकाला मारहाणः भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) फायनान्सचे बाऊन्सिंग चार्जेस भरले नसल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी रिक्षा ताब्यात मागितली. त्यावेळी रिक्षा देण्यास नकार दिल्याने तिघांनी रिक्षा...

Recent Comments