Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज गुंड शरद मोहोळ प्रकरणात आणखी एका आरोपीला अटकः आता पर्यंत 16 जणांना...

गुंड शरद मोहोळ प्रकरणात आणखी एका आरोपीला अटकः आता पर्यंत 16 जणांना अटक तर मुख्य सुत्रधारही झाला जेरबंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात मुख्य आरोपींच्या संपर्कात असणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली आहे. अभिजित अरुण मानकर (वय-३१, रा. दत्तवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. इतर आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणातून अभिजित मानकर हा आरोपींच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते.

५ जानेवारी रोजी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात शरद मोहोळचा साथीदार असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी खून केला होता. याप्रकरणात आता पर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईलचे क्लोन करण्यात आले असून त्यात १९ हजार ८२७ ऑडिओ क्लिप, रेकॉर्डिंग मिळवून आले आहे. यातील १० हजार क्लिपचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून यातील ६ क्लिप या शरद मोहोळ खून प्रकरणाशी संदर्भात आहेत. यातील ६ क्लिप मध्ये शरद मोहोळचा खून करतांना प्रत्यक्ष जागेवर असणाऱ्या मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्या संपर्कात अभिजित मानकर होता. आरोपी अभिजित मानकरची ८ दिवशी चौकशी केल्यानंतर त्याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. बुधवारी अभिजित मानकरला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शरद मोहोळ खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विठ्ठल शेलार, साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले आणि गणेश मारणे हे ९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत आहेत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments